Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

जुगार उड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी जुगार अड्ड्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना एका भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं.

भाजप पदाधिकाऱ्यासह २ ते ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात भाजपचा पदाधिकाऱ्याला जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जुगार खेळताना या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची आणि सहकारनगर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापेमारी केली. औदुंबर विठ्ठल कांबळे असे या भाजपच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कांबळे याच्यासोबत इतर २ ते ३ जण जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. या सर्वांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

औदुंबर कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट २ ने छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे आढळून आलं. डाव रंगात आला असतानाच पोलिस त्याठिकाणी पोहचल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.