Pune Municipal Corporation : कोंढव्यातील आठमजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेची धडक कारवाई

हडपसर कोंढवा खुर्द परिसरातील जे. के. पार्कजवळील आठमजली अनधिकृत इमारतीवर पुणे महापालिकेने आज कारवाई केली. यामध्ये पाच हजार चौरस फुटांचे आरसीसी बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई विशेष पथकाच्या माध्यमातून करण्यात आली.

कोंढव्यात ही अनधिकृत इमारत बांधून त्यातील सदनिका विकण्याचा प्रयत्न होता. पण महापालिकेने नोटीस बजावून कारवाई केली. ही इमारत आता धोकादायक झाली असून, नागरिकांनी तिचा वापर करू नये, तसेच कोणतीही सदनिका विकत घेऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

दुर्लक्षामुळे कारवाईस स्थगिती

कोंढव्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्यात क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर एका सोसायटीने अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या बांधकामाला नोटीस बजावली, मात्र कारवाई केली नाही, त्यामुळे या सोसायटीने न्यायालयात जाऊन कारवाईवर स्थगिती आणली आहे.