पुणे प्रतिनिधी (Anjali Damania On Eknath Khadse) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार गटाचे नेते, ज्येष्ठ राजकारणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना काल रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी अटक केली. त्या रेव्ह पार्टीमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरून अचानक ऑर्डर आल्या म्हणून खडसेंच्या जावयावर अचानक रेड झाली. एवढं नक्कीच कळतं की ही साधीसुधी रेड नक्कीच नाही असं दमानिया म्हणाल्या. यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशयही अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.
खडसे महाजनांविरुद्ध बोलल्याने रेड पडली ?
कसं आहे की, खडसेंनी मला छळ छळ छळलं म्हणजे गेले कित्येक वर्ष ते मला इतका प्रचंड त्रास देतात. पण काल जेव्हा ऐकलं की त्यांच्या जावयावर अचानकपणे वरून ऑर्डर झाल्या म्हणून रेड झाली, तेव्हा नक्कीच एवढं कळलं की ही काही साधीसुधी रेड नक्कीच नाहीये. एकनाथ खडसे हे गेले काही दिवस गिरीश महाजन यांच्याविरुद्ध बोलतात म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस लावले का असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला. त्यांनी काय केलं हे त्यांचं त्यांना माहीत . आता प्रांजल केवलकर यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाहीये. पण हे ज्या पद्धतीने झाल आहे, म्हणजे अगदी काही लोकांनाच अटक केली, त्यातील फक्त एकाचं नाव लीक होणं, त्याला रेव्ह पार्टी म्हणणं… खरं सांगायचं तर रेव्ह पार्टी म्हणजे शेकडोनी लोकं असतात, साऊंड असतो, डान्स असतो आणि मग त्यातच ड्रग्स आणि दारू असली तर त्याला रेव्ह पार्टी म्हटलं असतं. मला असं वाटतं की राजकीय षड्यंत्र आहे असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.