पुणे (Pune Dhayari) पुणे शहरातील धायरी येथील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले खंडोबा मंदिराच्या पायथ्याला एस.ओ.पी.एस लोकसेवक मंडलच्या वतीने 200 झाडासह वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी धायरी गावातील व परिसरातील तरुणांनी मुलांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला
झाडे लावा पर्यावरण वाचवा या संदेशासोबत यावर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण लागवड करण्याचा मानस सर्वांनी केला यामध्ये जांभूळ, वडपिंपळ, कडूलिंब, जंगली, बदाम, बदाम, कुसुम, बावा, चाफा,औदुंबर, अर्जुन, चिंच,अशा विविध प्रकारच्या 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
लोकसेवक मंडल संस्थेचे सेक्रेटरी बाबासाहेब जोरे म्हणाले की यावर्षी मोठ्या प्रमाणात झाडे लावून आपल्या गावाला हरित आणि सुंदर करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शेखर चव्हाण,रणजीत जाधवराव, भाऊसाहेब कामठे, अतुलबापू पोकळे, विशाल शेठ बेनकर, अविनाश पोकळे, हर्षल पोकळे, शिवलिंग पोकळे, विजय पाटोळे, यशवंत खिल्लारे, शंकर कामठे पाटील, पाटील साहेब, विजय माताळे, माने साहेब, अक्षय पोकळे, यश कुंभार, रितेश जोरे, पद्माकर लायगुडे,अतुलदादा रायकर, गंगाधर भडावळे, धनंजय दिघे, मनोज जाधव, प्रसाद पोकळे, महेश पोकळे, संजय पोकळे, यांच्यासह 5o हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.