बालेवाडी येथे मोफत न्यू आधार कार्ड कॅम्पचे आयोजन

Share

पुणे प्रतिनिधी (Baner-Balewadi aadhar card) आधार कार्ड हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. सरकारी योजना असो, बँकिंग व्यवहार असो किंवा कोणताही महत्वाचा अर्ज भरायचा असो आधार शिवाय काहीच पुढे सरकत नाही.

आज अनेक कारणांनी लोकांचे मोबाईल नंबर बदलतात. पण आधारशी लिंक केलेला नंबर जर बंद झाला असेल, तर OTP मिळवून आधार पडताळणी पूर्ण करणं अशक्य होतं. मग बँकेतील व्यवहार, पासपोर्टसाठीचे कागदपत्र, सरकारी योजना, किंवा नोकरीसाठीचे अर्ज काहीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच, अनेक लोकांना जुन्या नंबरऐवजी नवीन नंबर आधारशी लिंक करायची गरज भासते.

त्याच पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे शिवम बालवडकर जनसंपर्क कार्यालय येथे न्यू आधार कार्ड कॅम्पचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बालेवाडी बाणेर सुस पाषाण माळुंगे परिसरातील नागरिकांनी या आधार कार्ड कॅम्पचा आवश्यक लाभ घ्यावा असे आव्हान बालवडकर यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *