सुसगाव माळुंग्यातील रस्ते मोठे होणार पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Share

पुणे प्रतिनिधी (DCM Ajit Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला. दोन आठवड्यापूर्वीच अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कचा दौरा केला होता.

हिंजवडी, बाणेर, लगतच मुंबई बेंगलोर हायवे जवळ असलेले गाव म्हणजे सुस, माळुंगे, वाढत्या शहरीकरणामुळे या गावात देखील मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आले आहेत,

भविष्यातील अडचणी विचारात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पीएमआरसह हिंजवडी, सुस, माळुंगे, आणि शहर परिसराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवश्यकतेनुसार रस्ते रुंदीकरण करणे अपेक्षित आहे ,

यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून रस्ते रुंदीकरणासह दुरुस्ती करत नागरिकांच्या प्राथमिक गरजा अशा पूर्ण होतील, त्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.

अजितदादांच्या या निर्णयामुळे भविष्यातील उपयोजना व नागरी विकासासाठी रस्ते रुंदीकरण करणे हे काळाची गरज आहे, स्थानिक भूमिपुत्रांना गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देताना सांगितले की, कोणीही कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, मग तो कोणीही असो. 353 दाखल करा, मग तो अजित पवार असला तरीही, असे ते म्हणाले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मार्फत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश यापूर्वीच दिलेले आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *