पुणे प्रतिनिधी (Pune)
भारताचा सध्याचा काळ हा स्टार्टअपचा काळ आहे. व्यवसाय आणि व्यापार्यांसाठी देश एक मजबूत इकोसिस्टम बनत आहे. भारताकडे आता स्टार्टअप हब म्हणून पाहिले जात आहे. कारण देशात 99 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आणि 30 अब्ज डॉलर्सच्या 107 युनिकॉर्न कंपन्या आहेत. दरम्यान, अनेक तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते, पण पैशांच्या समस्येमुळं अनेकांना व्यवसाय सुरु करण्यात अडचणी येतात.
मात्र परिसरातील तरुणांना शासकीय योजनेची माहिती नसल्यामुळे तरुण व्यवसायात उतरत नाहीत कर्ज विषयी माहिती नसते यासाठी पुणे आम आदमी पार्टीच्या वतीने यांच्यावतीने धायरी येथे मोफत प्रश्नोत्तर व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन सयाजी प्री प्रायमरी स्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केले आहे,
प्रश्न उत्तर व मार्गदर्शनाला महाराष्ट्र शासनाचे विभागीय निवृत्त अधिकारी तथा महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचे सुरेश उमाप यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी जास्तीत जास्त तरुणांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.