पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) मुंबईनंतर पुणे पिंपरी चिंचवड हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे शहर आहे. पिंपरी चिंचवड शहरात देशभरातून नाही, तर जगभरातून नागरिक येत असतात, हिंजवडी आयटी, उद्योग नगरी, शैक्षणिक संस्था, पिंपरी चिंचवड शहरात आहेत.
गेल्या दशकात शहराचा झपाट्याने विस्तार झाला, रक्षक चौक येथील सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो त्यामुळे निर्माण झालेल्या नागरिक समस्येवर देखील परिणाम होतो यावर महापालिकेने त्वरित मार्ग काढावा असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात ते म्हणाले की ग्रेड सेपरेटरचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे, शाळा, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा या वेळेत या मार्गावर प्रचंड वाहतूक ठप्प होते, यावर तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग ट्राफिक व्यवस्था सुरक्षा उपयोजना राबवण्यात अशी मागणी शहराध्यक्ष काटे यांनी केली आहे,
काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक वाहतूक मार्गदर्शन करणारे बोर्ड कामाच्या कालावधीत लावले गेले पाहिजेत व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियंत्रण ठेवण्यात यावे व कामाची गती वाढून हे काम लवकरात लवकर मार्गी ला जावे असे निर्देश संबंधित ठेकेदारांना देण्यात यावेत अशी देखील मागणी त्यांनी यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.