पुणे प्रतिनिधी -: तालुक्यातील चौफुला इथल्या अंबिका कला केंद्रावर झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर यांचं नाव समोर आलं आहे.
येथील न्यू अंबिका नावाच्या कलाकेंद्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचा वेग वाढवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींमध्ये भोर वेल्हा मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांना देखील पोलिसांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा होत आहे.
यामुळे आता आमदार मांडेकर यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा होत आहे. अशातच या प्रकरणावर आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला भावाने काहीही सांगीतलं नाही. आम्ही ठरवलं पाहीजे कसं वागायच ते. जी शिक्षा असेल ती मिळाली पाहिजे. मी किर्तनात असतो, माझा भाऊ कलाकेंद्रावर गेला हे शॉकींग आहे, अशी प्रतिक्रिया मांडेकरांनी दिली आहे.
काय म्हणाले मांडेकर?
मला या घटनेची काही कल्पना नव्हती. मला काल दूपारी पोलीसांचा फोन आला. मी पोलिसांना सांगितलं की कायद्यानुसार कारवाई करा. मी कोणताही दबाव टाकला नाही. काय घडलं ते मलाही माहीत नव्हतं आणि पोलिसांनाही माहीत नव्हतं. मी भावाला सांगितलं की पोलिसांच्या समोर हजर हो. माझा लहान भाऊ समाजकार्य करतो. शेती करतो. भाऊ सकाळी घरा आला. एक भाऊ चोर असतो एक देव असतो… मी माझं काम करतो.