पुणे प्रतिनिधी :: प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धेसह कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढलेले प्रमाण पाहता विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता लक्षात घेऊन, कौशल्यवाढीच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन ते बाणेर, बालेवाडी, सूस व महाळुंगे परिसरातील दहावी व बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते,
या कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते.
स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धकांना बक्षीस वितरण व मानचिन्ह देण्यात आले,
बाणेर, बालेवाडी, सूस व महाळुंगे परिसरातील दहावी व बारावीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ त्याचप्रमाणे महापालिकेच्या विद्यालयातील ५ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार बोलत होते.
सध्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर वाढला असून, याकडे दुर्लक्ष न करता शालेय विद्यार्थ्यांनी ‘एआय’चा अभ्यास करावा. राज्य सरकारने कौशल्य विकास आणि एआय प्रशिक्षणाकरिता भरीव आर्थिक तरतूद केली आहे.
सरकारकडून क्रीडा विभाग आणि खेळाडूंच्या मदतीसाठी कायम सहकार्य केले जाते. काळानुसार शिक्षणाची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचे शिक्षण मिळायला हवे याकरिता सरकारी स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. क्रीडा विभागातील विविध प्रलंबित कामांसाठी क्रीडा आयुक्तांनी २५ कोटींचा प्रस्ताव सादर केला असून, यास तत्काळ मंजुरी दिली आहे.” बाबूराव चांदेरे यांनी प्रास्ताविक केले. समीर चांदेरे यांनी आभार मानले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, स्पर्धा आयोजक व राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कविता आल्हाट, नाना काटे, निर्मला नवले, ज्ञानेश्वर तापकीर, गणपतराव बालवडकर, रोहिणी चिमटे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक तसेच परिसरातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.