पिंपरी प्रतिनिधी (Pimpri-Chinchwad) रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजविण्यासाठी आणि गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी मोशी चऱ्होली मंडल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सामाजिक कार्यकर्ते निलेश उद्धव बोराटे जनसंपर्क कार्यालय देहू रस्ता मोशी येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे,
शिबिराच्या आयोजकांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू मोशी चऱ्होली मंडल यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
हा उपक्रम केवळ रक्तदान नाही, तर माणुसकीला जोडणारा एक सशक्त दुवा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक शिबिराचा भाग व्हावा, असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले.