ऋषी मुळीक (पुणे प्रतिनिधी) सहकार हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा असून, २०४७ मध्ये विकसित भारत करायचा असल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याची गरज आहे, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकाराची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
त्यामुळेच केंद्र सरकारने गाव पातळीवरील प्राथमिक कृषी सहकारी संस्था बळकट करण्याचे ठरविले आहे. त्यात ‘नाबार्ड’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
आज यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी यशोदा पुणे येथे नाबार्डच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त वर्धापन दिन साजरा करण्यात आला,
महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी जिल्हा बँकेंना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नाबार्डचा उत्कृष्ट पुरस्कार जाहीर
पुणे विभागातून पुणे जिल्ह्यात अग्रेसर असलेली बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाहिले जाते, आज या बँकेला उत्कृष्ट बँक म्हणून गौरवण्यात आले,
मुळशीच्या भूमिपुत्राच्या हस्ते मुळशीच्याच भूमिपुत्राने स्वीकारला पुरस्कार सभागृहात टाळ्यांचा कडकडाट
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उत्कृष्ट बँक म्हणून गौरवण्यात आले, हा पुरस्कार केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर, व मुळशीचेच भूमिपुत्र असलेले पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी स्वीकारला.
यावेळी राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘नाबार्ड’च्या मुख्य सरव्यवस्थापक रश्मी दराड, गोवर्धन रावत, रायगड सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार जयंत पाटील, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यावेळी उपस्थित होते.