बाणेर प्रतिनिधी :: बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेली वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक सोयी-सुविधा या बरोबरच पाण्याची गंभीर समस्या आहे, यासंदर्भात महापालिकेने टँकर सुरू केले मात्र या टॅंकरने खरंच नागरिकांना सोसायटी यांना पाणीपुरवठा होतो का नाही यासाठी महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेकडून मोबाइल ॲप विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे आता एखाद्या सोसायटीला पाणीपुरवठा केल्यानंतर ठेकेदारास संबंधित सोसायटीला महापालिकेने दिलेला ओटीपी पालिकेस सादर करणे बंधनकारक असणार आहे
https://chat.whatsapp.com/HnV4ABoXcoyF2UEuuYDxXW?mode=ac_t
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर बाणेर- बालेवाडी भागात सोसायट्यांना दिल्या जाणाऱ्या टॅंकरसाठी हे ॲप वापरण्यात येत आहे.
शहरात दररोज सरासरी ३५ ते ४० हजार टॅंकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये महापालिकेकडून शहरात सध्या नव्याने समाविष्ट गावांना दररोज १४०० टॅंकरने पाणी दिले जाते, तसेच ठेकेदारांकडून आणि सोसायट्यांकडूनही जादा पाण्यासाठी पैसे भरून चलन करून टॅंकर घेतले जातात.