कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – कबड्डी स्पर्धा २०२५ आयोजन – बाबुराव चांदेरे

Share

कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरुष व महिला “पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२५” स्पर्धेचे भव्य आयोजन

पुणे प्रतिनिधी :: तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते.या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो,

या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत आहे असे प्रतिपादन आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे बोलत होते,

कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव साळवी चषक व पुणे लीग कबड्डी स्पर्धेचे आयोजन २०२५ घोषणा करताना ते म्हणाले की; 16 ते 20 जुलै दरम्यान बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात कुस्तीचा थरारा पाहायला मिळणार आहे,

2012 पासून महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीपटूंना आपण व्यासपीठ तयार करून देत आहोत व याच्यातून मिळालेला आनंद हा मनस्वी खूप मोठा असतो,

राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुरुषांचे १२ संघ व महिलांचे १२ संघ तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण ३३६ खेळाडूंनी ( पुरुष व महिला ) आपला सहभाग नोंदविला तसेच पुणे लिग स्पर्धेकरिता पुरुषांचे ८ संघ व महिलांचे ८ संघ तयार करण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यातून एकूण ३५२ खेळाडूंनी ( पुरुष व महिला ) सहभाग नोंदविला आहे. सदर हि स्पर्धा मॅटवर होणार असून ४ मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार अनुभवयास मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेला पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सचिव दत्तात्रय झिंजुर्डे, सतेज संघाचे अध्यक्ष नासीर सय्यद, माणिक गांधिले, राजेंद्र ढमढेरे, संदीप पायगुडे, अर्जुन शिंदे, जंगल रणवरे, अर्जुन ननावरे, आदेश देडगे इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *