पुणे प्रतिनिधी – : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ नाव नोंदणी अभियान, पुणे शहर महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस व वामा वुमन्स क्लब, बाणेर यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे,
या उपक्रमाचा शुभारंभ आज मुंबईत थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्या हस्ते पार पडला.
यावेळी भोर-राजगड-मुळशीचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण आणि आमदार दिलीप सानंदा उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विधाते यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व कौतुक देखील केले.
यावेळी पूनमताई विधाते म्हणाल्या की; घरेलू कामगार नाव नोंदणी अभियानातून शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक योजनेची माहिती योजनेचे लाभ मिळावेत म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत व शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही तत्पर असणार आहोत असे आश्वासन दिले.