विजय कुलकर्णी (बाणेर प्रतिनिधी) महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनने नुकतीच बाणेर येथील श्री. आशिष अर्जुन ताम्हाणे यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. ताम्हाणे हे एक प्रख्यात वकील आणि नोटरी असून, त्यांची ही निवड असोसिएशनच्या सदस्यांनी एकमताने केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/CpAIGQtMUxgHIkphDc5ULj
नवनवीन घडामोडी व आपल्या भागातील बातम्या व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029Vb9yW9YKmCPX7kNeWt0A
महाराष्ट्र आणि गोव्यामधील नोटरींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या असोसिएशनने, श्री. ताम्हाणे यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी त्यांची निवड केली आहे. असोसिएशनने त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या मौल्यवान सहकार्याची आणि मार्गदर्शनाची अपेक्षा केली आहे.
या निवडीमुळे बाणेर भागात सर्वत्र पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला.