पिंपरी प्रतिनिधी (BVG Group Pimpri-Chinchwad) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात बीव्हीजी संस्थेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोड उल्लंघनामुळे रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बीव्हीजी संस्थेचा ठेका रद्द करून ड्रेसकोडचे काटेकोर पालन करणारी नवीन संस्था नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/CpAIGQtMUxgHIkphDc5ULj
नवनवीन घडामोडी व आपल्या भागातील बातम्या व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029Vb9yW9YKmCPX7kNeWt0A
सायली नढे यांनी पत्रात नमूद केले आहे की, बीव्हीजी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित केलेला ड्रेसकोड पाळला जात नाही. यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज आणि रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय, अनेक कर्मचारी दुपारी जेवणासाठी घरी जात असल्याने, बाहेर जाताना एखाद्या कर्मचाऱ्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. “जिजामाता रुग्णालयातील रुग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. बीव्हीजी संस्थेचा ठेका रद्द करून नवीन आणि जबाबदार संस्थेची नियुक्ती करावी,” अशी मागणी नढे यांनी केली आहे. त्यांनी आयुक्तांना या प्रकरणी त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.