Pune update मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या आमदारासह इतर आमदारांनाही चांगलेच झापले. तसेच घरी बसावं लागेल, असा इशाराही दिला
भाजपफडणवीसांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. तेही संतापाच्या स्वरात म्हणाले, सदस्यांना पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण-लाडकी बहीण. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनांशी तुलना करता येत नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.चे आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अत्यंत पोटतिडकीने अवैध दारू विक्रीबाबतचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले, मागील सरकारमध्ये एक आणि आता एक लक्षवेधी मांडली होती. आपल्या दालनामध्ये तीन बैठका झाल्या. त्यावर अजूनही कारवाई नाही. ग्रामीण भागातील प्रत्येक आमदाराचा हा विषय आहे. त्यांना रोज काय त्रास, होतोय हे त्यांना विचारा.
लाडक्या बहिणींचे दु:ख काय असेल, तर अवैध दारूवर आळा घालावा, हे आहे. दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपण बैठक घेतली. आपण उत्पादन शुल्क, गृह विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला निर्देश दिले. अध्यक्षांनी निर्देश देऊनही काय होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे, असे सांगत पवार यांनी थेट फडणवीसांकडे असलेल्या गृह विभागाकडेही बोट दाखविले.
फडणवीसांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. तेही संतापाच्या स्वरात म्हणाले, सदस्यांना पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावे लागले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण-लाडकी बहीण. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनांशी तुलना करता येत नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
