आरटीओ बदलीसाठी 50 लाख रुपयांचा रेट; माजी मंत्राने केला भ्रष्टाचार उघड

Pune RTO) अतिरिक्त आयुक्त असलेल्या भरत कळसकर (Bharat Kalaskar) यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला. त्याने 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मागितले, त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

भरत कळसकर याने शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला. तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही विचारला.

आरटीओमधे अतिरिक्त आयुक्त असलेला अधिकारी भरत कळसकर हा अधिकारी त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगतो. आतापर्यंत त्याने 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं तो सांगतोय. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे असं तो सांगतोय. आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे याची माहिती समोर आणा अशी मागणी अनिल परब यांनी केली.