Pune पुण्याच्या वाघोली (Pune News) भागात आला आहे. घरातील कचऱ्यासोबत चुकून फेकली गेलेली सोन्याची अंगठी, एका कचरावेचक महिलेने चक्क महापालिकेच्या अवाढव्य कचरा कंटेनरमध्ये उतरून शोधून काढली.
रेखा साकट असे या महिलेचे नाव आहे. प्रामाणिकपणामुळे वाघोलीतील विजय विहार सोसायटीत सध्या त्यांचे नाव अभिमानाने घेतले जात आहे.
सोसायटीतील एक कुटुंब दुसऱ्या शहरात स्थलांतरित होत असताना जुन्या सामानासोबत चुकून त्यांची सोन्याची अंगठीही कचऱ्यात गेली. अंगठी हरवल्याची बाब लक्षात संध्याकाळी लक्षात आली, तोपर्यंत ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक रेखा साकट यांनी तो कचरा इमारतीखालील मोठ्या कंटेनरमध्ये टाकला होता. रात्रीची वेळ असल्याने शोध घेणे अशक्य होते, मात्र ‘स्वच्छ’च्या समन्वयक पौर्णिमा ओव्हाळ यांनी तातडीने महापालिका प्रशासनाला तो कंटेनर हलवू नका, अशी विनंती केली.
दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापासून ‘सर्च ऑपरेशन’ सुरू झाले. रेखा साकट यांनी स्वतः त्या घाणीने भरलेल्या कंटेनरमध्ये उडी घेतली. एका हाताने कचऱ्याच्या पिशव्या तपासत आणि दुसऱ्या हाताने संबंधित नागरिकांना ‘व्हिडिओ कॉल’वर घेत, त्या एकेक वस्तूची खातरजमा करत होत्या. सुमारे 5 टन कचरा आणि शेकडो पिशव्यांच्या तपासणीनंतर, अखेर एका पिशवीच्या तळाला ती सोन्याची अंगठी सापडली. पौर्णिमा ओव्हाळ आणि रेखा साकट यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
