पुणे प्रतिनिधी (MP Supriya Sule) खडकवासला विधानसभा मतदारसंघातील धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौकातील व पारी कंपनी चौकातील देशी विदेशी दारू दुकाने अनेक कालखंडापासून सुरू होते, वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली रस्ते मात्र वाढले गेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्यातून मोठा त्रास सहन करावा लागतो तासंतास ट्राफिकचा सामना करावा लागतो, याच मुख्य चौकातील दारूच्या दुकानामुळे तळीरामांचे वाद पाहायला मिळतात आणि या वादामुळे देखील ट्राफिक खोळंबली जाते, दुकानासमोर रस्त्यावर अनेक गाड्या लावलेल्या असतात, त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी दुकाने त्वरित बंद करावेत अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यापूर्वी देखील धायरी गावामध्ये दारू दुकान बंद करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते,
हे दुकाने ड्रायडे च्या दिवशीही दुकाने सुरू असतात, छोटी कारवाही करून प्रशासन वेळकाढूपणा करत आहेत. दारू दुकाने कायमस्वरूपी बंद करे पर्यंत लढा सुरू राहणार आहे.
महाआरती आंदोलनात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा स्वाती पोकळे,महादेव पोकळे, अँड . राजेशाही मिंडे, , सनी रायकर, राजेश पोकळे, अरुण अण्णा गायकवाड,ज्ञानेश्वर कामठे यांनी यापूर्वी आंदोलन केले होते.