पुणे प्रतिनिधी (Pune Vasnat More) लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम करत वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघाची निवडणुकीत लढवली. या निवडणुकीत वसंत मोरे यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतर काही महिन्यातच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
मी आज १०० टक्के पुण्याचा खासदार असतो असं सांगत त्यांना काँग्रेसने तिकीट फायनल केले होते असं विधान केले आहे.
एका मुलाखतीत वसंत मोरे यांनी म्हटलं की, आज कोणत्याही परिस्थितीत वसंत मोरे पुण्याचा खासदार झाला असता. मला काँग्रेसचे तिकीट फायनल झाले होते. त्यासाठी मला शरद पवार, संजय राऊत यांनी मदत केली होती. राहुल गांधी यांच्यापर्यंत मला मदत झाली होती. माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते परंतु त्यानंतर अचानक कुठे माशी शिंकली माहिती नाही. माझ्याबाबत राजकारण झाले. रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या २ दिवस आधी माझे तिकिट कॅन्सल झाले असं त्यांनी सांगितले.
तसेच मराठा समाजाचा चेहरा भाजपाने मुरली मोहोळ यांना उमेदवारी दिली होती. मी जे काही काँग्रेसमध्ये पटवून दिले होते, त्यात मराठा विरुद्ध मराठा लढला पाहिजे तर खऱ्या अर्थाने पुण्याच्या निवडणुकीत रंगत येईल. धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होऊ शकत नाहीत. माझा हट्ट होता. तुम्ही मला संधी द्या. काँग्रेसच्या कोअर कमिटीतील ५ पैकी ४ जणांनी माझ्या नावाला सहमती दाखवली होती. परंतु पुण्यातील काँग्रेसमधील काही नेत्यांच्या पोटात गोळा आला. या गोष्टीला वर्ष झाले. काँग्रेसच्या शहर कार्यकारणीतील काही लोकांनी मन मोठे केले असते तर आज पुणे शहरात काँग्रेसचा खासदार असता असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.
दरम्यान, मी नरिमन पाँईटला बैठकीत सांगितले होते. जे उमेदवार दिले ते सहा महिन्यात पक्षात राहणार नाही अशी भविष्यवाणी मी केली होती. धंगेकरांना मी सांगितले होते, तुम्ही लढू नका. मी लढतो. मी जे गणित मांडले होते. त्यात साडे तीन लाखांची मते काँग्रेसला होती. २०१९ च्या निवडणुकीत ३ लाख ३६ हजार मते काँग्रेसला पडली होती