सुसमध्ये रंगला खेळ पैठणीचा!

पुणे प्रतिनिधी :: भारतीय जनता पार्टीचे धनश्री भोते व सुहास भोते यांच्या माध्यमातून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सुस व परिसरातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

चांडाळ चौकडी फेम ‘खेळ पैठणी’ हा भव्य उपक्रम सुस येथील आयरीस लॉन्स येथे उत्साहात व दिमाखात पार पडला.

परिसरातील शेकडो महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे अनेक परप्रांतीय महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमात महिलांसाठी विनोदी संवाद, मजेशीर खेळ, नृत्य, गाणे यांची मनसोक्त मेजवानी देण्यात आली. महिलांनी मुक्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे सादरीकरण रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी फेम) यांनी विनोदी शैलीत करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमात आकर्षक बक्षिसांचे विशेष आकर्षण होते. भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रिक स्कूटर, टीव्ही, फ्रिज, कुलर, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी अनेक मौल्यवान बक्षिसे देण्यात आली, यामुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.

या उपक्रमाचे आयोजन सौ. प्रियांका विनायक चिव्हे (सदस्या, भाजपा) यांनी केले. महिलांसाठी आनंदाचे, सहभागाचे आणि व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळत असल्याने अनेक महिलांनी भावनिक शब्दांत आयोजकांचे आभार मानले.

प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये —
महिला मोर्चा अध्यक्षा वैदही बापट, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, मयुरी कोकाटे, धनश्री भोते, तसेच महिला मोर्चातील सर्व पदाधिकारी यांचा समावेश होता.
याशिवाय सरचिटणीस पुनीत जोशी, मंडलाध्यक्ष लहू आण्णा बालवडकर,शिवम बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, अनिकेत चांदरे, शरद तात्या भोते, चंद्रकांत जाधव, काळुराम गायकवाड, सुहास भोते, राजेंद्र पाडाळे, राकेश पाडाळे, प्रकाश तापकीर, शिवाजी चिव्हे, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, खंडू खैरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी महिलांनी अशा उपक्रमांमुळे समाजातील एकोपा बळकट होत असून आनंद व संवाद वाढीस लागतो, अशी भावना व्यक्त केली.