केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शरद लाटे
पुणे (Pune) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी,’देशात गरिबी वाढत आहे आणि सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे मोठे विधान केले आहे.
वाढत्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर, पैशाचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे जेणेकरून केवळ आर्थिक विकासच होणार नाही तर गावकऱ्यांचे कल्याण देखील सुनिश्चित होईल” असे म्हटले आहे.
हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती केंद्रित होत आहे. असे होता कामा नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे विकसित केली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचे कल्याण सुनिश्चित होईल” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी,”आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरजहळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती केंद्रित होत आहे. असे होता कामा नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे विकसित केली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचे कल्याण सुनिश्चित होईल” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी,”आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल झाले आहेत.”असे सांगितले. आहे आणि या दिशेने अनेक बदल झाले आहेत.”असे सांगितले.