आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणारा ट्रक ड्रायव्हर अनिश शेख जेरबंद

Share

अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी ट्रक ड्रायव्हर अनिश महंमद हनिफ शेख (वय ३२, रा. चकलंबा, ता. गेवराई, जि. बीड ) याला पोलिसांनी अटक केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. तो तेलंगणा राज्यातल्या निजामाबाद जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तिथं जाऊन त्याला अटक केली आणि नगरला आणलं.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

ट्रक ड्रायव्हर अनिश शेख हा माल ट्रक घेऊन तेलंगणात गेला होता. या दरम्यानच्या काळात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचं ‘ते’ स्फोटक भाषण शेख याने सोशल मीडियावर ऐकलं आणि त्याचं पित्त खवळलं. रागाच्या भरात त्याने आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अहिल्यानगरच्या एलसीबीला शेख याचा सुगावा लागला आणि एलसीबीच्या पथकानं त्याला जेरबंद केलं.पोपटासारखं बोलणार का अनिश शेख?

अहिल्यानगर एलसीबीच्या पथकाने आरोपी अनिश शेख याला पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या हवाली केलं आहे. कोतवाली पोलीस ‘पुढील तपासा’त आरोपी शेखचा कशा पद्धतीने ‘पाहुणचार’ करतात, हे पाहणं, नगर जिल्ह्यासाठी मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे. आरोपी शेख याने आमदार संग्राम जगताप यांना धमकी देण्यापूर्वी आणखी कोणकोणती गुन्हेगारी कृत्यं केली आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नक्की काय आहे, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत, याचा तपास कोतवाली पोलीस करणार का आणि मुख्य म्हणजे कोतवाली पोलिसांच्या या तपासानंतर अनिश शेख हा पोपटासारखा बोलणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

अजूनही आहे अहिल्यानगर ‘एलसीबी’चा करिश्मा…!

अहिल्यानगर एलसीबीच्या कर्तबदारीवर हल्ली प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काहींच्या मते अहिल्यानगर एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपयुक्तता संपली आहे. ही मंडळी निष्क्रिय झाली आहे, असाच अनेकांचा अपसमज झाला आहे. परंतू वस्तुस्थिती अशी आहे, अहिल्यानगर एलसीबीमध्ये असे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत, की ज्यांच्याकडे प्रचंड असं खबऱ्यांचं ‘स्ट्रॉंग नेटवर्क’ आहे. कुठलाही गुन्हा घडला, की त्या गुन्ह्यातला संभाव्य गुन्हेगार कुठं लपला आहे, याची खडा न् खडा माहिती अहिल्यानगर एलसीबीतल्या अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका क्षणात मिळते. आमदार संग्राम जगताप यांना देणाऱ्या आरोपी अनिश शेख याचा मागमूस काढून त्याला तेलंगणातून अहिल्यानगर एलसीबीच्या पोलिसांनी जेरबंद केलं. अनिश शेख याच्यासारखे अनेक गुन्हेगार अहिल्यानगर येथील पोलीस पथकाने आतापर्यंत जेरबंद केलेले आहेत. यावरुन अजूनही अहिल्यानगर एलसीबीचा करिश्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही.

अहिल्यानगरच्या ‘एलसीबी’त आपल्याच मर्जीतला अधिकारी हवा…!

अहिल्यानगरच्या ‘एस.पीं’ची सर्वात विश्वासू शाखा, संपूर्ण जिल्ह्यातल्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची अमर्याद कार्यक्षमता असलेली स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही या जिल्ह्यातली कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नगर जिल्हा पोलीस दलाचा ‘आत्मा’ आहे. एलसीबीत काम करण्यासाठी ‘वशिल्या’पेक्षा कर्तृत्व महत्त्वाचं असतं. मात्र कर्तृत्व नसतानाही एलसीबी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्याच मर्जीतला अधिकारी त्याठिकाणी असावा, अशी अपेक्षा असते. अर्थात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे असा कुठलाही विचार न करता प्रामाणिकपणे काम करणाऱ्यालाच प्राधान्य देतील, यात शंकाच नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *