Pune काळेपडळ (Pune Crime) परिसरातून एक अतिशय (Pune News) धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या आईच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केले आणि त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली.
काळेपडळ पोलिसांनी या प्रकरणी चेतन सूर्यकांत आरणे (वय 25, रा. प्रगतीनगर, हडपसर) आणि पीडित मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 2023 ते 2024 या कालावधीत घडली होती. काळेपडळ पोलीस ठाण्याला 4 डिसेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षातून एक निनावी फोन आला होता. काळेपडळ भागात एक अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बाळासह राहत असल्याची माहिती या फोनद्वारे देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता हा सर्व भयंकर प्रकार उघड झाला. (Marathi News)
वारंवार अत्याचार
आरोपी चेतन आरणे हा पीडित मुलीच्या आईसोबत राहत होता. याच काळात त्याने या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि एप्रिल 2024 मध्ये तिने ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. यावेळी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आरोपी चेतन आणि मुलीच्या आईने कट रचला. त्यांनी नागपूर महानगरपालिकेचा एक बनावट जन्म दाखला तयार केला, ज्यामध्ये मुलीचे वय अधिक दाखवण्यात आले होते. हा खोटा दाखला त्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना दाखवून मुलगी सज्ञान असल्याचे भासवले आणि पोलिसांची दिशाभूल केली.
