टीसीएसचे कर्मचारी चिंतेत! तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Share

पुणे प्रतिनिधी (TCS  Employee) सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा प्रदाता कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) पुढील आर्थिक वर्षात (एप्रिल 2025 ते मार्च 2026) आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांची, म्हणजेच अंदाजे 12,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

तंत्रज्ञानातील (Technology) वेगाने होणारे बदल आणि भविष्यासाठी अधिक ‘अ‍ॅजाइल’ (Agile) आणि तयार राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जगभरातील कर्मचाऱ्यांवर परिणाम, सीईओंचे स्पष्टीकरण

दरम्यान, या कपातीचा परिणाम कंपनीच्या जगभरातील (Global Workforce) आणि विविध क्षेत्रांतील (Domains) कर्मचाऱ्यांवर होणार आहे. टीसीएसचे सीईओ के. कृतीवासन (K Krithivasan) यांनी ‘मनीकंट्रोल’ला (Moneycontrol) दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “आम्ही नवीन तंत्रज्ञान विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) आणि ऑपरेटिंग मॉडेलमधील बदलांवर लक्ष केंद्रित करत आहोत. कामाच्या पद्धती बदलत आहेत. आम्हाला भविष्यासाठी तयार राहायचे आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर करत आहोत आणि भविष्यासाठी आवश्यक कौशल्यांचे मूल्यांकन करत आहोत.”

ते पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या करिअर ग्रोथ आणि नियुक्तीच्या संधींसाठी आम्ही खूप गुंतवणूक केली आहे. तरीही, आम्हाला असे आढळले आहे की, काही भूमिकांमध्ये कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती (Redeployment) प्रभावी ठरली नाही. याचा आमच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के कर्मचाऱ्यांवर (Employees) प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील (Middle and Senior Levels) कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. हा सोपा निर्णय नव्हता आणि सीईओ म्हणून मला घ्यावा लागलेल्या सर्वात कठीण निर्णयांमधील हा एक आहे.” जून अखेरच्या तिमाहीतील टीसीएसची कर्मचारी संख्या 6,13,000 आहे, त्यामुळे 2 टक्के कपातीमुळे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.

कठोर निर्णय पण सहानुभूतीपूर्ण प्रक्रिया

कृतीवासन यांनी स्पष्ट केले की, “अधिक मजबूत टीसीएस घडवण्यासाठी हा एक कठीण निर्णय आहे.” कंपनी ही प्रक्रिया शक्य तितकी सहानुभूतीपूर्ण (Compassionate) ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी नोटीस पिरियडचा (Notice Period) पगार, अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेज (Severance Package), विमा लाभांचा विस्तार (Insurance Benefits) आणि ‘आउटप्लेसमेंट’च्या (Outplacement Opportunities) संधी उपलब्ध करुन दिल्या जातील. टीसीएस ही भारतातील खासगी क्षेत्रातील (Private Sector) सर्वात मोठ्या नियोक्त्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या या पुनर्रचनेच्या (Restructuring) निर्णयामुळे इतर छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्याही असेच पाऊल उचलू शकतात.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *