Pune Division Teachers Constituency: पुणे विभाग शिक्षक मतदार संघ यासाठी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. नंदनवन येथे होत असलेल्या बैठकीत सचिन सानप यांच्या नावा संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सचिन सानप हे स्वत: प्राध्यापक असून ते अनेक वर्ष शिक्षकांचे प्रश्न मांडत आहेत. सचिन सानप हे उदय सामंत यांचे निकटवर्तीय आहेत. सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल. पक्षातील सर्वच नेत्यांना खासदार आमदार यांना सचिन सानप यांना पाठींबा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नंदनवन येथे महत्त्वाची बैठक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये नंदनवन येथे महत्वाची बैठक झाली. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची बैठक.मंगेश चिवटे यांना तातडीने नंदनवन बंगल्याबर बोलवून घेतले होते. या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, ओमराजे निंबाळकर, भावना ताई गवळी, विजय शिवतरे, शहाजी बापू पाटील, रवींद्र धनगेकर आणि इतर आमदार खासदार व महत्वाचे नेते उपस्थित होते.
रवींद्र धंगेकर यांची महत्त्वाची माहिती
या बैठकी संदर्भात नेते रवींद्र धंगेकर यांनी माहिती दिली. पुणे शिक्षक पदवीधर मतदारसंघा बाबत बैठक झाली. यामध्ये पक्षाची काय भूमिका असावी यासंदर्भात शिंदे यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं. शिक्षक मतदार संघामध्ये निवडणूक कशाप्रकारे लढवायची हे सांगितलेलं आहे . नाराजीचा विषय काहीच नाही मंगेश चिवटे यांनी अर्ज मागे घेतलेले आहे आज पक्षाचा माध्यमातून कसा प्रकारे निवडणूक लढवली पाहिजे त्या संदर्भात चर्चा झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आजचा बैठकीतून चांगली बातमी आहे आता उमेदवार कोण द्यायचा आणि कशी निवडणूक लढवायची या संदर्भात चर्चा झाली. शिक्षक मतदार संघामध्ये पुण्यामध्ये चिवट्यांचा फॉर्म मागे घेतलेला आहे मग आता पाठिंबा कोणाला द्यायचा किंवा दुसरा उमेदवार कोणाचा आहे का या संदर्भातली साधक-बाधक चर्चा झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित होते. आज मुख्यमंत्री यांच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर नव्हते अशी माहिती बोलत होते पण असे नाराजी नाट्य नाही, असा दावाही धंगेकर यांनी केला.
