महिला, बालक व विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांना निवेदन
मुळशी प्रतिनिधी -: मुळशी तालुक्यातील पौड पंचायत समिती गणातील विविध गावांमधील महिला बालक विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कासाठी व शाळेतील मागणीसाठी मुळशी पंचायत समितीच्या सदस्य काजल अंकुश मोरे यांनी आज पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांची भेट घेत निवेदन देत त्यांनी मागणी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
- प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता.
- प्रत्येक शाळेत स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहांची उभारणी.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV यंत्रणा बसविणे.
- CRP महिलांच्या मासिक मानधनात वाढ करणे.
- CRP महिलांना प्रवास भत्ता मंजूर करणे.
- CRP महिलांना शासकीय कामकाजासाठी टॅब उपलब्ध करून देणे.
- अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे.
- महिला बचत गटांना बाजारपेठ, प्रदर्शन व विक्रीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे.
पौड गणातील महिला, बालके व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे यांच्याकडे केले आहे त्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत आपण बैठक लावून असे आश्वासन दिले.
