PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद

PM Kisan yogana पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २४ तासांत बळीराजाच्या खात्यावर जमा होणार आहे. पण त्याआधीच लाखो शेतकऱ्यांना मोठा झटका बसला आहे. अपात्रता आणि कागदपत्रांमधील त्रुटींमुळे चक्क २ लाख शेतकऱ्यांचे नाव सरकारने यादीतून वगळले आहे.

जर तुम्हीही ई-केवायसी (e-KYC) किंवा भूमी अभिलेख (Land Seeding) अपडेट केले नसेल, तर या यादीत तुमचेही नाव असू शकते. या कारवाईमागील नेमके कारण काय आणि तुमचे नाव यादीत आहे का? त्यामुळे तुम्हाला २००० रुपये मिळणार की नाही, हे तपासण्यासाठी लाभार्थ्यांनी तातडीने आपले स्टेटस तपासावे…

२० तारखेला देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २३ व्या हप्ता खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये हस्तांतरित करणार आहेत. पण त्याआधीच अधिकृत पीएम किसान पोर्टलवर एक महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. pmkisan.gov.in पोर्टलवर शेअर केलेल्या २ जूनच्या वेळापत्रकात, पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यापेक्षा अंदाजे २ लाख नावे कमी आहेत.आनंदाची बातमी! सरकार लाडक्या भावांच्या बँक खात्यात टाकणार १५००० रुपये, काय आहे नवी योजना?

पीएम किसान पोर्टलवर २ लाख शेतकऱ्यांची नावे वगळल्याची स्पष्ट दिसतेय. पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) आवश्यक आहे. पती-पत्नी दोघेही किंवा कुटुंबातील एक प्रौढ आणि एक अल्पवयीन सदस्य लाभ घेत असतील, तर त्यांना लाभ मिळणार नाही. इतकेच नाही, तर ज्यांनी १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमिनीची मालकी मिळवली आहे, ते देखील पात्र नसतील, अशी स्पष्ट माहिती संकेतस्थळावरल देण्यात आली आहे.

23 व्या हप्त्याआधी 2 लाख नावे वगळली?

पंतप्रधान मोदींनी १३ मार्च रोजी आसाममधून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’चा २२ वा हप्ता हस्तांतरित केला. या कालावधीत ९४.६ दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० जमा करण्यात आले होते. पण यावेळी पीएम किसन योजनेची रक्कम ९४.४ दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे केंद्राने सांगितसले. म्हणजेच २ लाख शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली.

शेतकऱ्यांची संख्या कशी कमी झाली

१९ वा हप्ता – १०,०६,८५,६१५

२० वा हप्ता – ९,७१,४१,४०२

२१ वा हप्ता – ९,३५,७९,८६९

२२ वा हप्ता – ९,४६,१५,३०९

पीएम किसानचे पैसे तुमच्या खात्यात येणार का?

पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार का? हे तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

संकेतस्थळावर’तुमची स्थिती जाणून घ्या’ वर क्लिक करा.

नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (पीएम-किसान) २३ वा हप्ता शनिवार, २० जून रोजी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथील तारकेश्वर येथून हा निधी हस्तांतरित करतील. मिळालेल्या माहितीनुसार, या २३ व्या हप्त्यामध्ये ९४.४ दशलक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात १८,८८० कोटी रुपये जमा केले जाणार आहेत.