Pune MLC Election : विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर संकट; अर्ज बाद करण्यासाठी शरद पवार गटाची न्यायालयात धाव?

pune news Parth pawar पुणे विधानपरिषदेची निवडणूक आता अत्यंत इंटरेस्टिंग मोडवर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध असताना देखील विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

काकडे यांनी आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप शरद पवारांच्या पक्षाकडू करण्यात आला आहे. पुणे विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुणे शहराध्यक्ष असलेल्या श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काकडे यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी निर्माण होऊन अर्ज बाद झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून सुनील टिंगरे यांचा डमी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. ज्यामध्ये काकडे यांनी मालमत्तेची माहिती लपवली असून विक्रम काकडे यांनी मालमत्ता कर न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेतील टॅक्स भरला नाही व खोटी माहिती दिली म्हणून आक्षेप घेण्यात आला. विक्रम काकडेंच्या अर्जावर आक्षेप घेतल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळून लावण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कोर्टात जाणार आहे.