Pune गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आयएएस अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत.
यामध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार असलेल्या बापू पठारेंचे जावई आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांची बदली करण्यात आली होती. मात्र अखेर त्यांनी ती बदली रद्द करून घेतलीच आहे.
अमोल झेंडेंनी बदली रद्द करून आणलीच
राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल होत आहे. गेल्या आठवड्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात झेंडे यांची 21 मे 2026 रोजी करण्यात आलेली मीरा भाईंदर वसई विरार येथे झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा पुण्यामध्येच असलेल्या पीएमआरडीए येथे बदली देण्यात आली आहे.
त्यांच्या या बदलीमुळे राजकीय क्षेत्रात त्यांच्या असलेल्या कुटुंबीयांचा प्रभाव स्पष्ट दिसत असल्याची टीका केली जात आहे. कारण झेंडे यांचे सासरे हे बापू पठारे आहेत जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. तर झेंडे यांच्या पत्नी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.
दुसरीकडे झेंडे यांच्यासोबत इतरही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये अमरसिंह जाधव सध्या ठाण्यात पोलिस उपआयुक्तपदी कार्यरत होते. त्यांची नवी मुंबईला बदल करण्यात आली मात्र, पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने बदली रद्द करुन त्यांची नियुक्ती पुन्हा ठाण्यात पोलिस उपआयुक्तपदी करण्यात आलीयं.
तर निलेश सोनावणे हे नवी मुंबई पोलिस उपआयुक्तपदी (वायरलेस कोस्टल डिव्हीजन) कार्यरत होते. त्यांची ठाणे येथे महामार्ग सुरक्षा पथक पोलिल अधीक्षकपदी बदली करण्यात आलीयं. रुपाली अंबुरे यांची नवी मुंबई पोलिस अधीक्षक(डायल -112) येथे बदल करण्यात आलीयं. तसेच संदीप पालवे यांची छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक लोहमार्ग येथे नियुक्ती करण्यात आलीयं.
स्वाती भोर यांची सांगली पोलिस प्रशिक्षण केंद्र प्राचार्यपदी बदली करण्यात आलीयं. कविता नेरकर यांची छत्रपती संभाजीनगर राज्य राखीव पोलिस बल क्र 14 समादेशकपदी बदली करण्यात आलीयं तर वैशाली माने यांची मिरा भाईंदर वसई विरार पोलिस उपआयुक्तपदी बदली करण्यात आलीयं. यासोबतच अरविंद चावरिया यांची मुंबई राज्य राखीव पोलिस बल पोलिस उपमहानिरीक्षकपदी बदल करण्यात आली आहे. विनिता साहू सध्या मुंबई राज्य राखीव पोलिस बल पोलिस उपमहानिरीक्षकपदी कार्यरत होत्या. त्यांची नागपूरच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आलीयं.
तसेच अरविंद साळवे हे सध्या महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथे सहसंचालक पदावर कार्यरत होते. त्यांची मुंबई पोलिस उपमहानिरीक्षक(दहशतवाद विरोधी पथक) नियुक्ती करण्यात आलीयं. श्रीकांत परोपकारी मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागात उपआयुक्त सागरी सुरक्षा विभागात कार्यरत होते. त्यांची बृहन्मुंबई पोलिस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीयं. तसेच श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेडच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आलीयं.
