सर्व स्तरातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर अभिनंदनचा वर्षाव
पिंपरी वार्ताहर – : डॉ. होमी भाभा फाउंडेशन (मुंबई), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त समर्थनाम ट्रस्ट फॉर डिसेबल FIS ग्लोबल यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील 41 शाळांनी सहभाग घेतला होता, यामधील पिंपरी चिंचवड शहरातील संचेती विद्यालय थेरगाव येथील चार विद्यार्थ्यांची इस्रो साठी निवड झाली आहे.
श्रावणी नितीन शिंदे, सार्थक गहीनाथ मोहरकर, यशराज बालाजी चव्हाण, या विद्यार्थ्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हाईस कंट्रोल रोबोट हा प्रकल्प सादर करून सर्वांचे लक्ष वेधून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका नेहा गुमते यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहनलालजी संचेती सर, सचिव वर्षा टाटिया, संस्थेचे उपाध्यक्ष कुमार आदित्य टाटिया, ऐश्वर्या बेदमुथा, शाळेचे मुख्याध्यापक विभाग प्रमुख सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
