अजितदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज यांना विजयी करा
मुळशी प्रतिनिधी – : राज्यात 7 फेब्रूवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये मुळशी तालुक्यातील पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
पौड-अंबडवेट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर हे आज प्रचार सभेत बोलत होते यावेळी ते म्हणाले की जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत हीच खऱ्या अर्थाने, अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल,
अजितदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी पवार कुटुंबाच्या मागे उभे राहू अशी भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी आजवर त्यांना अजितदादांच्या सोबतीत आलेले अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत याबाबतचे अनुभव व्यक्त केले. बहुतांश कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.
अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने उभा केलेले जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना मुळशीकरांनी मतदान करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केले आहे. पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद वाळंज आणि पंचायत समितीचे उमेदवार मोरे काजल अंकुश, प्रवीण अंकुश धनवे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.
आपल्या भागाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची खात्री मी देतो असे देखील यावेळी ते म्हणाले.
