साधेपणा, संयम आणि सेवानिखिल बोऱ्हाडेची नवी ओळख; प्रभागातील नागरिकांचा मिळतोय मोठा पाठिंबा

PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात 1 हजार 856 उमेदवार आहेत. अर्ज माघारीसाठी शुक्रवार (दि. 2) दुपारी तीनपर्यंतची वेळ आहे. त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, सर्वच 32 प्रभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

महापालिकेच्या 32 प्रभागांत एकूण 128 जागा आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निखिल बोऱ्हाडे यांनी चांगलाच प्रचाराचा जोर धरला असून; साधेपणा, संयम आणि सेवा हीच नवी ओळख मिळाल्याने जनतेतून प्रभागातून त्यांना मोठा नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.

प्रभागाचा विकास हा शब्दांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अनुभवता यावा, हाच माझा निर्धार आहे. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.

  • निखिल बोऱ्हाडे, उमेदवार, भाजपा, प्रभाग- 02