Pune पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्र. २ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजपाने याठिकाणी पूजा मोरे – जाधव यांना उमेदवारी दिली होती.
सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले. अनेकांनी त्यांची जुनी विधाने पुन्हा व्हायरल करून थेट भाजपा पक्षश्रेष्ठींना जाब विचारला. आपल्या विधानांचा विपर्यास केल्याचे पूजा मोरे यांनी सांगूनही ट्रोलिंग न थांबल्यामुळे आज अखेर पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले.
