PMC Election: खराडी-वाघोलीत शांताराम कटकेंची धनुष्यबाणाकडे वाटचाल

Pune news – महापालिका निवडणूकीसाठी भाजपने अनेकांना धक्का दिला आहे. गेली दीड दशके सत्तेत असल्याने यावेळी अनेक अनुभवी व दिग्ग्जांना नारळ देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

बंडखोरीची शक्यता लक्षात घेता, फारसा गाजवाजा न करता उमेदवारांना परस्पर बोलावून पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शांताराम कटके यांना आमदार माऊली कटके यांच्या हस्तक्षेपामुळे अचानकपणे शेवटच्या टप्प्यात उमेदवारी नाकारण्यात आली.

त्यानंतर लगेचच शिवसेनेच्या पुणे शहरातील प्रमुख नेत्यांनी कटके यांच्याशी संपर्क साधून त्यांना शिवसेनेचा एबी फॉर्म दिला आहे,

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शांताराम कटके यांच्याशी संपर्क साधत फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या कटके यांनी देखील तत्परता दाखवत शिंदेंचा आदेश मान्य केला.

शांताराम कटके यांना मानणारा या भागात खूप मोठा वर्ग आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत; शासन नियुक्त नगरसेवक पदी वर्णी लागल्यानंतर करोडो रुपयांचा निधी खेचून आणत त्यांनी विविध विकासाच्या योजना आपल्या प्रभागामध्ये केल्या होत्या.