Pune news Ncp – गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातीह एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभाग क्रमांक 33 मध्ये ठाकरे शिवसेनेचे संदीप पाटीलबुवा मते यांनी मशाल एवजी तुतारीवर निवडणूक लढण्याचा निश्चय केला आहे; कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे मात्र या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 33 मध्ये तुतारीचा संपूर्ण पॅनलच विजय होण्याच्या मार्गावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक काकासाहेब चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अनिताताई इंगळे संदीप पाटील मते वर राहुल सदाशिव पोकळे किंवा शुक्राचार्य वांजळे यांचे पॅनल होण्याची शक्यता आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीने मते यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतलेला आहे भविष्यकाळात विकासाच्या योजना रखडलेला विकास सिंहगड रोडवरील वाढलेली ट्रॅफिक ही समस्या पाणी अशा मूलभूत गरजा निश्चित सोडवलेला असतील असे प्रतिपादन संदीप मते यांनी केले
