Pune मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बीड येथील विशेष MCOCA न्यायालयात मंगळवारी दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद संपन्न झाला.
सुनावणीदरम्यान चार नंबरचा आरोपी प्रतीक घुले याने अचानक ॲड. बारगजे यांची स्वतंत्र वकील म्हणून नियुक्ती केली. नवीन वकिलांनी “मला पुरावे पाहण्यासाठी वेळ हवा,” अशी मागणी केली. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. “खटल्याला आधीच बराच विलंब झाला आहे. वारंवार वकील बदलून तीच ती कारणे दिली जात आहेत, हे व्हायला नको,” अशा शब्दांत कोर्टाने आरोपींना फटकारले.
पुराव्यांच्या प्रतींवरून वाद
आरोपींच्या वकिलांनी असा दावा केला की, “लॅपटॉपमधील फॉरेन्सिक डेटाच्या प्रती आम्हाला मिळालेल्या नाहीत. जोपर्यंत पुरावा मिळत नाही, तोपर्यंत तो स्वीकारला जाऊ नये.” यावर उज्वल निकम यांनी स्पष्ट केले की लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले की, “यात खाजगी पुरावे असल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे सरसकट डेटा देता येणार नाही.” न्यायालयाने मध्यस्थी करत, डेटा उपलब्ध होताच वकिलांना देण्याचे आदेश दिले
