Ajit Pawar पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ‘ : 17 पैकी 10 नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, भाजपाला अवघ्या 3 जागा

Pune जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची लिटमस टेस्ट असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज रविवारी (ता.21) झाली. या मतमोजणीत पुणे जिल्ह्यातील 17 पैकी 10 नगरपालिकांवर राष्‍ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

इंदापूरला प्रतिष्ठेच्या झालेल्‍या निवडणुकीत भरत शहा विजयी झाले आहेत. त्यांनी बंडखोर प्रदीप गारटकर यांचा पराभव केला. सासवडला काँग्रेस मधून भाजपात आलेले संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप विजयी झाल्या असून, त्यांच्या माध्यमातून भाजपापाचे जिल्ह्यातील खाते उघडले आहे. तर भाजपाला तळेगाव आणि आळंदी येथे विजय मिळवत, 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नगरपालिकानिहाय विजयी नगराध्यक्ष आणि पक्ष

  • – बारामती – सचिन सातव (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – लोणावळा – राजेंद्र सोनवणे – (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – दौंड – दुर्गादेवी जगदाळे – (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – तळेगाव दाभाडे – संतोष दाभाडे (भाजपा महायुती)
  • – चाकण – मनिषा गोरे (शिवसेना)
  • – जुन्नर – सुजाता काजळे (शिवसेना)
  • – आळंदी – प्रशांत कुऱ्हाडे (भाजप) (BJP)
  • – शिरूर – ऐश्‍वर्या पाचर्णे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • सासवड – आनंदी काकी जगताप (भाजप)
  • – जेजुरी – जयदीप बारभाई (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – भोर – रामचंद्र आवारे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – इंदापूर – भरत शहा (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – राजगुरूनगर – मंगेश गुंडाळ (शिवसेना)
  • – वडगाव – आबोली ढोरे (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – माळेगाव बुद्रुक – सुयोग सातपुते (राष्‍ट्रवादी काँग्रेस)
  • – मंचर – राजश्री गांजळे (शिवसेना)
  • – फुरसुंगी ऊरूळी देवाची – संतोष सरोदे (राष्‍ट्रवादी काँग्रेस) (NCP)