Pune update आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीसोबत जायचे की स्वबळावर लढायचे, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तणाव उघडपणे समोर आला आहे.
नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीत काहीसा तणाव पाहायला मिळत आहे. महायुती म्हणून शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार आहे, मात्र पुण्यासंदर्भात आम्ही अजित पवारांच्या पक्षाविरुद्ध लढू, अशी थेट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.
