Ncp Ajit Pawar and ncp ajit pawar राज्याला जिल्हापरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकीची घोषणा होणार आहे. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने चर्चांना उधान आले आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणाची शक्यता आहे. याच युतीवर चर्चा करण्यासाठी संभाजीनगरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाली आहे. शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन आणि अजित पवार गटाचे अभिजित देशमुख यांनी एकत्र येत युतीसंदर्भात चर्चा केली आहे. बैठकीचे काही फोटोही बाहेर आले आहेत. एमआयएमला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र आले पाहिजे असे अजितदादा गटाचे अभिजित देशमुख यांना वाटते. तर भाजपला दूर ठेवण्यासाठी चांगल्या लोकांनी एकत्र आले पाहिजे असे मत शरद पवार गटाचे ख्वाजा शरफोद्दीन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
