पिंपरी चिंचवड भाजपाचे ठरले; इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत मोठा निर्णय
पिंपरी चिंचवड : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहर भारतीय जनता पार्टी ॲक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून आले,
आज पिंपळे सौदागर येथे शहर भारतीय जनता पार्टीचे कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती,
पिंपरी चिंचवड शहर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली
या बैठकीला राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील महामंत्री राजेश पांडे, उपस्थित होते यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, मा. खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, मकरंदजी देशपांडे, सदाशिव खाडे, पिंपरी चिंचवड शहरातील आजी माजी महापौर, पक्षाचे सरचिटणीस, नगरसेवक, मंडल प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी चंद्रकांत दादा पाटील यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून संपूर्ण आढावा घेतला यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की युतीच्या बाबतीत आम्ही 70 ते 80 टक्के युती बाबतीत आग्रह होत, मात्र भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे एका जागेस 8 ते 10 जन इच्छुक आहेत,
उमेदवारी देताना देखील सर्वे व स्थानिक नेतृत्वाच्या सल्ला घेऊनच उमेदवारी फायनल होईल असे देखील यावेळी ते म्हणाले.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे नेते मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘‘विकसित महाराष्ट्र’’ घडवण्यासाठी भाजपाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवणे आणि ‘‘शत प्रतिशत भाजपा’’ निर्धार यशस्वी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला
