निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, बीएलओंचं मानधन दुप्पट,

Pune News राज्यांमध्ये मतदार यादीची एसआयआर म्हणजेच स्पेशल इंन्टेसिव्ह रिव्हिजन सुरु आहे. या दरम्यान निवडणूक आयोगानं बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच बीएलओच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएलओला पहिल्यांदा 6000 रुपये मानधन मिळायचं ते आता 12000 रुपये दिलं जाणार आहे. याशिवाय बीएलओ सुपरवायझरच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे.

पहिल्यांदा बीएलओ सुपरवायझरला 12000 रुपये मानधन मिळायचं ते आता 18000 रुपये करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.