beed news राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची भरसभेत धनंजय मुंडे यांनी आठवण काढली. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी, काय चुकलं..काय नाही, हे न्यायव्यवस्था बघेल, असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्याकडे जे काही असेल त्या माध्यमातून आपण गोरगरीबांना मदत करीत होतो.. पण ९-१० महिने झाले ते काम बंद आहे. कार्यालय चालू आहे.. हे सगळं बोलत असताना आपला एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव मला होतोय.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले, माझ्यासारख्या सहकाऱ्याला सहकार्य करतो म्हणून मलासुद्धा याची जाणीव करुन द्यावी लागेल. काय चुकलं, काय नाही.. ते न्यायव्यवस्था बघेल. आज काही महिने आम्ही कमी पडलो असलो तरी येणाऱ्या चार वर्षांत ही कमतरता भरुन काढण्याची जबाबदारी मी घोतो.
धनंजय मुंडे यांनी आजवर कधीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही किंवा वाल्मिक कराडच्या क्रूत्याबद्दल शब्दही काढलेला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपणच कसे बरोबर आहोत किंवा आपल्याला, आपल्या समाजाला कसं टार्गेट केलं जातंय, हेच सांगत आलेले आहेत. त्यात पुन्हा आजचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
