पदवीधर नोंदणीच्या गाफीलपणामुळे गेल्या वेळी पराभव; यावेळी सर्वाधिक नोंदणी युवा मोर्चाची असणार- दुष्यंत मोहोळ

पुणे प्रतिनिधी (BJP Pune News) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणुकांसाठी पुणे भारतीय जनता पार्टी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येत आहे,

निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ पुणे शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती.

त्यानंतर त्यांनी नवीन कार्यकारणीच्या बैठका घेऊन पुढे कुठला अजेंडा घेऊन निवडणुकीला कसे सामोरे जायचे त्याबद्दल सूचना देखील केल्या होत्या,

मात्र आज पक्ष कार्यालयात युवा मोर्चाची बैठक संपन्न झाली या बैठकीला आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत कशाप्रकारे पुढे गेले पाहिजे यावर सखोल चर्चा करण्यात आली मीटिंगच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी व पक्षाच्या विविध योजनांची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डोअर टू डोअर घेऊन जाण्यासाठी काय उपक्रम करावे लागतील यावर चर्चा करण्यात आली.

बैठकीतील प्रमुख मुद्दे

  1. मंडल कार्यकारणीतील नियुक्ती
  2. आघाडी कार्यकारणी
  3. पदवीधर मतदार नोंदणी
  4. शाखा उद्घाटन उद्घाटन
  5. प्रभारी कार्यकारणी आघाडी

यावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष भाजयुमो शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले की पक्षात पदे हे लहान मोठे नसतात यामध्ये आपण प्रामुख्याने राष्ट्रप्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या त्रिसूत्रीचा संकल्प मनाशी बाळगून काम केले पाहिजे ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नसून राष्ट्रसेवेची संधी आणि युवा शक्तीला योग्य दिशा देण्याचे व्रत आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करत असतो त्यांच्या सूचनांचे आपण पालन करत असतो.

पदवीधर नाव नोंदणीत युवा आघाडी आघाडीवर असणार

गेल्यावेळी पदवीधर निवडणुकीत आपला पराभव झाला मात्र यावेळी असे होऊ द्यायचे नाही महायुती म्हणून वरिष्ठ नेते ठरवतील कोणाला जागा द्यायची कुणाला नाही हा त्यांचा विषय आहे मात्र युवा मोर्चा आघाडी सर्वाधिक नाव नोंदणी करून सर्वाधिक लीड देण्याचे काम पुणे शहरातून करेल असा विश्वास युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रणव गंजीवाले, सरचिटणीस रोहन कोकाटे, योगेश जावीर, राहुल कापरे, सिद्धार्थ बावकर, संकेत विरामने, तेजस मारणे, एडवोकेट समीर जोरी, सुचित देशपांडे, स्वरूपा शिर्के, संकेत जाधव, योगेश जगताप, आकाश थोरात,प्रशांत लाटे, ओंकार तुपे, स्वरूपा रानडे, प्रणव भालेराव, निरंजन मराठे, शुभम दुघाने, निखिल थोरात, राकेश शिंदे, सौरभ कदम, अनुराग मिश्रा ,अनिरुद्ध कोकणे, मनीषा धारणे ,विराज रानवडे, पंकज गीते, प्रथम भालेराव, यश काळभोर,प्रवीण वाशिम, साहिल राजपूत, एडवोकेट यश काळभोर, राजू तोडकर, भूषण पाटील, रितेश सानप, शिवा बोरके, तुषार खल्वे, इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.