निगडी प्रतिनिधी – : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत यांची निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आता अनेक पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत.
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातून सात ते आठ माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार ,उद्धव ठाकरे, राज ठाकरे, व काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. कोणत्या पक्षाचे नगरसेवक प्रवेश करणार हे येत्या काही दिवसातच समजेल मात्र भाजप नेत्यांच्या गाठीभेटीसाठी माजी नगरसेवकांचा जोर वाढला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांना विचारले असता ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीत येण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत त्याच मोठ्या संख्येने माजी नगरसेवकाचा समावेश आहे मात्र आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच स्थानिक नेतेमंडळी इच्छुक माजी नगरसेवकांचा निर्णय एकत्र बसून येत्या काही दिवसातच घेणार आहोत अशी माहिती शहराध्यक्ष काटे यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका जाहीर झाल्या आहेत दरम्यान आता इन्कमिंग आउटगोइंग मोठ्या प्रमाणात होताना दिसून येणार आहे.
