Pune भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कर्डीले यांची प्राणज्योत मालवली.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. आमदार कर्डिले यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी (17 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता बुऱ्हानगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
