Ravindra Dhangekar & Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंनी भाजपशी पंगा न घेण्याची समज दिल्यानंतर धंगेकर म्हणाले

Pune news पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांना थेट लक्ष्य करणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समज दिली होती.

महायुतीत दंगा नको. माझं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याशी बोलणं झालं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र, यानंतही रवींद्र धंगेकर हे भाजप (BJP) नेत्यांविरोधातील तलवार म्यान करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण, सोमवारी त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना मी वेळ पडल्यास पुणेकरांसाठी (Pune) स्वत:चं राजकीय नुकसान करायला तयार असल्याचे म्हटले.

या सगळ्या प्रकरणात मी पुणेकरांसाठी बोलत आहे. यावर बोलल्याने उलट माझं राजकीय नुकसान होत आहे. मात्र, त्याची किंमत मोजायला मी तयार आहे, अस स्पष्ट मत शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केले . एकनाथ शिंदे माझा पाठीशी आहेत त्यांनाही गुन्हेगारी नको आहे. भाजपचे नेते टीका करतात त्यांनी स्वतःला आरशात पाहावे, असा टोलाही यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हाणला.