Pune News पुणे जिल्ह्यातून एका लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिसांनी विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाला अटक केली आहे.
आरोपी शिक्षक आहे प्रायव्हेट ट्युशन्स घेत होता. गुरूवारी सकाळी ट्युशनमध्ये मुलगी एकटी होती. शिक्षकानं तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सुरेश दौलत रौंदल (वय वर्ष ४६) असे आरोपीचे नाव आहे. सुरेश कात्रजच्या आंबेगावातील रहिवासी आहे. आरोपी स्वारगेट परिसराक खासगी ट्युशन्स घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७वाजून ४५ मिनिटांनी विद्यार्थिनी क्लासमध्ये एकटी होती. त्यावेळी शिक्षकाच्या डोक्यात सैतान घुसला.
त्यानं विद्यार्थिनीसोबत असभ्य वर्तन केले. सुरेश विद्यार्थिनीच्या जवळ गेला. ‘जेव्हापासून तू क्लास जॉईन केला आहेस, तेव्हापासून मला तू खूप आवडतेस. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तुला शाळेत नौकरी आणि एक सोन्याची अंगठी देईन’, असं शिक्षकाने विद्यार्थिनीला म्हटलं. तिने घडलेल्या घटनेबाबत कुटुंबाला माहिती दिली
कुटुंबाला यानंतर संताप अनावर झाला. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्वारगेट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षक सुरेशला अटक केली आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
